जळगाव – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार, असा निश्चय आव्हाने येथील मेळाव्यात मविआचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीकडून देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचे मेळावे घेतले जात आहेत. बुधवार दि. १८ रोजी जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील श्री लक्ष्मी जिनिंग येथे मविआच्या जळगाव तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी मंत्री गुलाबराव देवकर, खासदार उन्मेषदादा पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर विष्णू भंगाळे, लक्ष्मण पाटील (लकी आण्णा), आम आदमी पार्टीचे योगेश हिवरकर, गजानन मालपुरे, सुरेश चौधरी, निलेश चौधरी, रमेश माणिक मालपुरे, उमेश पाटील, मनोज चौधरी, बापू परदेशी, वाल्मिक पाटील, सरिता नेतकर, बाळासाहेब पाटील, भाऊसाहेब सोनवणे, विलास अशोक पाटील, विलास लाड यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून करण पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
शेकडो कार्यकर्त्यांचा मेळाव्यात प्रवेश
जळगाव तालुक्यातील कानळदा, भोकर, विदगाव, कुवरखेडा, चिंचोली, सावखेडा, खापरखेडा, धरणगाव तालुक्यातील झुरखेडा, निमखेडा, जांभोरे, म्हसावद येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश केला.