जळगाव – आज जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधित करताना सांगितले की, प्रत्येकाने बूथ जास्त भर देऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे . गावातून प्रत्येक मत हे करून घ्यायचे आहे त्यामुळे मी स्वतः करण पाटील उमेदवार म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडायची आहे. त्याचबरोबर आपापल्या गावांमध्ये सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करायचे आहे.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजयजी सावंत साहेब, माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,विष्णूभाऊ भंगाळे, लक्ष्मण पाटील (लकी आण्णा), योगेश हिवरकर, गजानन मालपुरे,सुरेश नाना चौधरी, निलेश चौधरी, रमेश माणिक मालपुरे, उमेश पाटील, मनोज चौधरी, बापू परदेशी,वाल्मिक पाटील,सरिता नेतकर, बाळासाहेब पाटील,भाऊसाहेब सोनवणे,विलास अशोक पाटील,विलास लाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.