जळगाव- शहरातील कंजरवाडा परिसरात अवैधरित्या देशी हातभट्टी दारूची तयार करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली.
यामाहितीनुसार, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या सुचनेनुसान एलसीबीचे पोहेकॉ कमलाकर बागुल, महिला कॉन्स्टेबल ललिता सोनवणे, पोकॉ. शरद भालेराव, अनिल देशमुख, रामकृष्ण पाटील, दीपक पाटील यांनी आज पहाटे कारवाई करून संशयित आरोपी माधुरी गोविंदा बाटुंगे (वय-२८, रा. सिंगापूर कंजरवाड) ही बेकायदेशीर दारू तयार करून विक्री करत असतांन रंगेहात पकडले. या कारवाईत साडेपाच हजार रूपयांची गावठी दारू उद्ध्वस्त केली.
तसेच दुसऱ्या घटनेत एलसीबीचे सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, पोहेकॉ अनिल इंगळे, विलास पाटील, रमेश चौधरी, महिला कॉन्स्टेबल ललिता सोनवणे, पो.ना. संतोष मायकल यांनी सिंधी कॉलनी परिसरातील कंजरवाडा परिसरात गावठी दारू बनवितांना संशयित आरोपी बेबीबाई हिरा नेमले (वय-५५ रा. सिंगापूर कंजरवाड) हीला रंगेहात पकडले.
संशयित महिलेच्या ताब्यातील ५ हजार ८०० रूपये किंमतीचे गावठी दारू हस्तगत केली तर कच्चे व पक्के रसायन नष्ट केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.