जळगाव – पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे करण्यात आली.
पारोळा तालुक्यातील टोळी येथील तरुणीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, तसेच इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. या निवेदनात मुड केले आहे की,
ही केस चांगला वकील लावून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जावी, मुलीच्या परिवाराला पुरेसे संरक्षण मिळावे, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मुलीच्या परिवाराला मनोधैर्य योजनेचा अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे मिळावा, जिल्ह्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिस स्टेशनच्या महिला संबंधी असलेला विभाग अधिकारी कार्यरत करावा, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींचा योग्य ट्रॅक ठेवावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी प्रतिभा शिंदे, भानुदास विसावे, मुकुंद सपकाळे, पांडुरंग बाविस्कर, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, माई अहिरे, नीता वानखेडकर, उज्वला अहिरे, उमेश सोनवणे, गोवर्धन जाधव, सुनीता लिंगायत, कैलास वाघ, सुवर्णा अहिरे, बबलू कोळी, योगिता ठाकरे, भारती बाविस्कर, विजया महाले आदी उपस्थित होते.