जळगाव प्रतिनिधी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जळगाव तालुका समन्वयकपदी विजय लाड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.
या संदर्भात अधिक असे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मान्यतेने जळगाव जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जळगाव तालुका समन्वयक पदी विजय लाड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर तसेच पक्षाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशानेही नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संपर्कप्रमुख सचिन असबे, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख उमेश पाटील तसेच शिवसेना जळगाव तालुका सर्व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.