जळगांव – जळगांव येथील सरदार वल्लभ भाई पटेल हाॅल येथे महाराष्ट्र राज्य चे मदत व पुनर्वसन ( कॅबिनेट ) मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शनिवार रोजी राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे जळगांव शहर महानगर जिल्हा सरचिटणीस पदी अरुणभाई चांगरे यांचे नातु तसेच राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र अरुणभाई चांगरे यांचे सुपुत्र यश जितेंद्र चांगरे यांची नियुक्ति करण्यात आली असुन अनिलदादा पाटील यांचे हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले.
सदर नियुक्ती ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांचे मान्यतेने करण्यात आलेली आहे.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संजयदादा पवार,जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष अभिषेक पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगांव जिल्हा अध्यक्ष रविंन्द्रनाना पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग जळगांव जिल्हा अध्यक्ष अरविन्दजी मानकरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष सुशिलकुमार शिंदे, जितेंद्र अरुणभाई चांगरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.