जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचा जळगाव व रावेर लोकसभा तथा विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी यांचा “विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा”चे आयोजन करण्यात आले आहे. मिळाव्यात लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे सक्रिय झाला आहे. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराबाबत प्रचार व राजकीय रणनीती बाबत मार्गदर्शन व विचारविनिमय हे या मेळाव्यात केले जाणार आहे.प्रमुख मार्गदर्शक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील उपस्थित असतील.कार्यक्रम शनिवार दि. 30 मार्च सकाळी 11:00 वाजता, लाड वंजारी मंगल कार्यालय, आकाशवाणी चौक येथे होणार आहे.
तरी जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, युवक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवती पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष व जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय पवार (जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष), उमेश नेमाडे (रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष), अभिषेक पाटील यांनी केले आहे.