जळगाव – संत ज्ञानेश्वर विद्यालय तर्फे छ. शिवाजी महाराज सप्ताह निमित्त छ. शिवाजी महाराज उद्यान मेहरुण येथील छत्रपती शिवाजी पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
दुपारी १.०० वा. पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात शाळेच्या ४०० विद्यार्थ्यांनी स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता सर्व विद्यार्थ्यांनी झाडाचा पालापाचोळा प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करून महानगरपालिकेच्या घंटागाडी मध्ये जमा केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व यावेळी स्वच्छते मोहिमेमध्ये शाळेतील सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.