जळगाव – शिवाजी महाराज सप्ताह अंतर्गत इ.३ री, ४ थी च्या विदयार्थ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषा घेण्यात आली. त्यामध्ये चार गट पाडण्यात आले होते . प्रत्येक गटाला गडाचे नाव देण्यात आले होते.
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रायगड गटाला शाळेतील मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला प्रमूख उपस्थिती शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका पर्यवेक्षक उज्वला नन्नवरे, स्वाती नाईक, साधना शिरसाट, कविता सानप यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करिष्मा वंजारी यांनी केले.