चोपडा प्रतिनिधी – चोपडा तालुक्यातील आडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा कवी लेखक साहित्यिक रमेश जे. पाटील यांना तारीख 4 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवन येथे दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
गुरुदेव सेवा मंडळ शाखा सटाणा जिल्हा नाशिक व गुरुदेव सेवा मंडळ शाखा जळगाव खान्देश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विशेष गौरव पुरस्कार 2023- 24 नुसार वैराग्यमूर्ती गाडगेबाबा समाजसेवा पुरस्कार व छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार या दोन पुरस्काराने त्यांना गौरवित करण्यात आले आहे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यवाह जगदीश एडलावार ,उपाध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ सटाणा , शीतल केदु देसले अध्यक्ष भाऊसाहेब पुंडलिक देसले व गुरुदेव सेवा मंडळाचे चोपडा तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र माधव बाविस्कर यावेळी हजर होते.