Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रचिती मीडियाचे सचिन घुगे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते विशेष सत्कार

by Divya Jalgaon Team
February 7, 2024
in जळगाव, सामाजिक
0
प्रचिती मीडियाचे सचिन घुगे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते विशेष सत्कार

जळगाव – गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने आदिवासी समाजाच्या विकास व सन्मानास्तव दि. ४ फेब्रुवारी रोजी भव्य जिल्हास्तरीय गडचिरोली महामेरेथोन सिझन २ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस दलातर्फे झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातील दुर्गम अतिदुर्गम भागातील  समाजाच्या सर्वच स्तरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुमारे १४ हजार आबालवृद्ध   धावपटू यात सहभागी झाले. ऐतिहासिक ठरलेल्या या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जळगावच्या प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.

एरवी नक्षली कारवायांच्या बातम्यांनी चर्चेत असलेले गडचिरोलीने या भव्य महामेरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमाच्या या अभूतपूर्व यशात जळगावातील प्रसिद्ध जाहिरात संस्था व मॅरेथॉन व्यवस्थापनाचा मोठा अनुभव असलेली प्रचिती मीडियाचा सिंहाचा वाटा आहे. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी प्रचिती मीडिया यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

जळगाव ते गडचिरोली हे प्रचंड अंतर असतांनाही प्रचिती मीडियाने हे आव्हान लीलया पेलले. स्पर्धकांना द्यावयाचे बिब्स , मेडल्स , टी शर्ट , सर्टिफिकेट्स , मॅरेथॉन किट, ट्रॉफीज यासारख्या सगळ्याच बाबी अतिशय उच्चतम दर्जाच्या व अचूक वेळेत प्रचितीने उपलब्ध करून दिल्यात . स्पर्धेचे मैदानातील व संपूर्ण शहरातील सर्व प्रकारचे डिझाइन्स , कट आउट्स , प्रिंटिंग संपूर्ण गडचिरोली वासियांचे लक्ष वेधून घेत होते.

अतिशय आव्हानात्मक असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनात प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे व त्यांच्या टीमने स्वतःला झोकून दिले होते. गेले अनेक दिवस व रात्र प्रचिती मीडियाचे एकच मिशन होते ते म्हणजे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील हि महामॅरेथॉन पुनःश्च  ऐतिहासिकरित्या संपन्न करणे आणि प्रचितीने ते करून दाखविले. म्हणूनच  या महत्वपूर्ण योगदानाबद्दल प्रचिती मीडियाचे सचिन घुगे यांचा उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री. मा. श्री. धर्मरावबाबा अत्राम , खासदार मा. श्री. अशोक नेते , गडचिरोलीचे आमदार मा. श्री.देवराव होली , आरमोरीचे आमदार मा. श्री. क्रिष्णा गजभिये , जिल्हाधिकारी श्री. संजय मीना , पोलीस महानिरीक्षक श्री . संदीप पाटील , पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल ,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग , अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता ,श्री.यतिश देशमुख, एम. रमेश  इत्यादी अधिकारी व आमदार , मोठे उद्योजक मान्यवर उपस्थित होते. मॅरेथॉन आयोजनाचा असलेला गडचिरोली पोलिसांचा उद्देश्य , प्रचिती मीडियाच्या काटेकोर नियोजनाने संपूर्णपणे सफल झाला हे निश्चित.

नक्षलींच्या दहशतीतून गडचिरोलीतील आदिवासी बाहेर पडत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. या उत्कृष्ट नियोजनामुळे पुढील वर्षाच्या मॅरेथॉनची आतापासून ओढ लागल्याची प्रतिक्रिया असंख्य स्पर्धकांनी व्यक्त केली.

Share post
Tags: #Mahamarathon Season 2#prachiti media#sachin ghuge#गडचिरोली
Previous Post

भाजपा पदाधिकार्‍याकडुन शाखा अभियंत्यास मारहाण रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे आज उद्घाटन

Next Post
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे आज उद्घाटन

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे आज उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group