जळगाव – मकर संक्रातीनिमित्त महिलांमध्ये हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. हळदी- कुंकुंवाच्या कार्यक्रमात शाळेतील महिलां पालकांनी पर्यावरणाला हातभार लावावा. यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हळदी – कुंकू निमित्त महिला पालकांना रोपं, बियाचे वाण लावण्यात आले. महिलासाठी हळदी – कुंकू निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विजेत्या स्पर्धकास संस्थेच्या संचालिका अर्चना नाईक व मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते बक्षीस म्हणून झाडाची रोपे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली आव्हाड यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी इयत्ता सातवीच्या मुलांनी झाडे लावा झाडे जगवा यावर एक पथनाट्य सादर केले. या उपक्रमात सहभाग घेण्यार्या महिला पालकांना प्लास्टिक कमीत कमी वापर करावा जेणेकरून पर्यवरणाला हानी होणार नाही असे आव्हान गोदावरी हॉस्पिटलच्या डॉ. कोमल पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे महापौर सीमाताई भोळे, जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल पवार- कुडचे, केंद्रप्रमुख तृप्ती बागुल, प्रतिभा वंजारी, उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षक –शिक्षकेतर कर्मचारीनी परिश्रम घेतले.