जळगाव – उपाध्याय प्रवर पूज्य गुरुदेव श्री प्रवीण ऋषी जी म सा हे एक तत्वज्ञानी आणि वैचारिक जैन धार्मिक गुरू आहेत ज्यांनी धर्माचे अतिशय सहज आणि सोपे स्पष्टीकरण देऊन आजच्या प्रत्येक पिढीची मने जिंकली आहेत.
त्यांनी अर्हम विज्जा फाउंडेशन ची स्थापना आध्यात्मिक बाग म्हणून केली आहे – जी ध्यान, ज्ञान, चारित्र्य आणि उत्तम नातेसंबंध निर्माण करण्यावर आधारित कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते.
जळगावातील ‘आनंदी दाम्पत्य शिबीर, गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली येथील रतनलाल सी बाफना स्वाध्याय भवन येथे २ ते ६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सुरू होत आहे. गुरुदेव प्रवीणऋषीजी म.सा. यांचे जळगावात वास्तव्य आहे.
तुमचे वैवाहिक जीवन आनंदी बनवण्याची कला गुरुदेव शिकवत आहेत. या शिबिराचा मुख्य उद्देश वैवाहिक जीवनातील सहयात्रेचे लक्ष्य आणि रहस्य समजावून सांगणे हा आहे.
सकाळी 9 ते 10 या वेळेत लेश्या आणि करण या विषयावर गुरुदेवांची व्याख्यानमाला सुरू होत आहे. तसेच गुरुदेव प्रवीणऋषीजी यांच्याकडून तरुण पिढीला जीवन व्यवस्थापनाची (लाइफ मैनेजमेंट) सूत्रेही समजावून सांगण्यात येत आहेत. हे आध्यात्मिक कार्यक्रम जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले आहे, आवाहन करण्यात आले आहे.