जळगाव – भरारी फाउंडेशनतर्फे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीं संस्थांना बहिणाबाई विशेष सन्मानाने सन्मानीत करण्यात आले. संजीव बावस्कर, संतोष चौधरी, प्रा. ईश्वरप्रसाद रितापूरे, पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी जळगांव, द फ्रेंड्स ऑफ एनिमल , हर्षल पवार, युवा शाहीर सुरज राउळ, डॉ. नरेंद्र चौधरी, एकता चौधरी, यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यादरम्यान विविध बचत गटांची त्यांच्या मालाच्या विक्रीतून १ कोटी ६० लाखांची उलाढाल झाल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.
महोत्सवात बचत गटांनी विक्रीस ठेवलेले खाद्य पदार्थ, दैनंदिन गृहोपयोगी वस्तू यांना ग्राहकाची विक्रमी दाद या आर्थिक उलाढालीतून यंदा मिळाली. याठिकाणी सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उत्पादनांचे स्टॉल तसेच खानदेश पर्यटनाचे दालन विशेष आकर्षण ठरले.
समारोपप्रसंगी शाहीर रामानंद उगले व सहकारी यांनी शिवराज्याभिषेक पोवाडा सादर केला व उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. या कार्यक्रमाने समारोप झाला. यावेळी खासदार उन्मेष पाटील,आमदार सुरेश भोळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रा. वासुदेव पाटील आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विनोद ढगे,सचिन महाजन, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, हेमंत पाटील, सागर पगारीया, दुर्गेश आंबेकर,मंगेश पाटील अभिषेक बोरसे, आकाश भावसार, हितेश चौधरी, स्वप्नील वाघ, यांनी परिश्रम घेतले सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी केले.