जळगाव – या वर्षी अ भा मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन साजरे होत आहे. हे संमेलन संपुर्ण महाराष्ट्रात एकुण 9 ठिकाणी साजरे होत असुन त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर “नाट्यजागर” सुध्दा होत आहे. हा नाट्य जागर साठी महाराष्ट्रातील 22 केंद्रांवर होणार असुन, त्यातील जळगाव केंद्रावर बालनाट्य व एकपात्री स्पर्धा संपन्न झाल्यात. लवकरच या स्पर्धाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दि. २६ जानेवारी व २७ जानेवारी रोजी के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात बालनाट्य स्पर्धा संपन्न झाल्यात. या बालनाट्य स्पर्धेत जळगाव, धुळे जिल्ह्यातील १३ संघांतील १७९ बालकलावंतांनी आपली बालनाट्ये सादर केलीत. स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, आय.एम.आर.चे डायरेक्टर प्रा.डॉ.बी.व्ही.पवार, नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे, परीक्षक श्रीमती ज्योती निसाळ (मुंबई), श्रीमती आसावरी शेटे (रत्नागिरी) व स्पर्धा समन्वयक गणेश तळेकर (मुंबई) आदींची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रास्ताविक कोषाध्यक्षा डॉ.शमा सराफ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद देसाई यांनी तर आभार प्रदर्शन मुख्यकार्यवाह पद्मनाभ देशपांडे यांनी केले.
दि. २८ जानेवारी रोजी के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात एकपात्री स्पर्धा संपन्न झाल्यात. या स्पर्धेत जळगाव, धुळे जिल्ह्यातील कलावंतांनी आपले एकपात्री प्रयोग सादर करण्यासाठी प्रवेशिका दाखल केली होती. या स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे, स्पर्धेचे परीक्षक प्रदीप राणे व श्रीनिवास नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रास्ताविक कोषाध्यक्षा डॉ.शमा सराफ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद देसाई यांनी तर आभार प्रदर्शन मुख्यकार्यवाह पद्मनाभ देशपांडे यांनी केले. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर परीक्षकांनी उपस्थित स्पर्धक व प्रेक्षकांशी संवाद साधत एकपात्री प्रयोगाविषयी तसेच नाट्यकलेचा जागर या स्पर्धात्मक महोत्सवाविषयी मार्गदर्शन केले.
दोन्ही स्पर्धातील सहभागी कलावंतांना अ.भा.मराठी नाट्य परिषदेतर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. नाशिक येथील स्पर्धा (दि.२९) आटोपल्यानंतर जळगाव, धुळे, नाशिक विभागाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात आला असून, यात प्रथम क्रमांक शशिकांत नागरे (धुळे), द्वितीय क्रमांक पूजा घोडके (नाशिक), उत्तेजनार्थ – सृष्टी कुलकर्णी (जळगाव), हर्षदीप अहिरराव (नाशिक) यांना पारितोषिके जाहीर झाली आहेत. यातील प्रथम दोन क्रमांकाचे स्पर्धक उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.हेमंत पाटील, सुबोध सराफ, योगेश शुक्ल, हर्षल पवार, प्रा.दिनेश माळी, प्रा.वैभव मावळे यांनी परिश्रम घेतलेत.