Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन

by Divya Jalgaon Team
November 1, 2023
in कृषी विषयी, जळगाव
0
जळगावात 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव  – कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या आठ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्‍या अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रोजी दुपारी 12 वाजता होईल. निर्मल सीड्सचे डॉ. सुरेश पाटील, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, ओम गायत्री नर्सरीचे मधुकर गवळी, मेट्रोजेन बायोटेकचे प्रियंक शहा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. प्रदर्शनात प्रवेश मोफत असून तंत्रज्ञानावर आधारीत या कृषी प्रदर्शनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
 तब्बल चार एकर परिसरात 210 पेक्षा अधिक स्टॉल्स असलेले अ‍ॅग्रोवर्ल्डचे चार दिवसीय कृषी प्रदर्शन खान्देशातील शेतकर्‍यांसाठी पर्वणी ठरणार आहे. बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकर्‍यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. अ‍ॅग्रोवर्ल्डचे जळगावतील यंदाचे हे नववे प्रदर्शन असून एक लाखांहून अधिक शेतकरी प्रदर्शनाला भेट देतात. जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषीतंत्र, श्रीराम ठिबक, निर्मल सिड्स, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, आनंद अ‍ॅग्रो केअर, मेट्रोजेन बायोटेक, कमलसुधा ट्रॅक्टर, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.
इलेक्ट्रिक बुल, करार शेती, ड्रोन, मिल्किंग मशीनसह प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
बियाणे पेरणी, कोळपणी, फवारणी करण्याबरोबरच जीपीएस तंत्रावर चालणारा तसेच मजूर समस्येला पर्यायी इलेक्ट्रीक बैल, ड्रोन यांसारखी यंत्रे व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी करार शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फळभाज्या – भाजीपाला, बांबू अशा अनेक प्रकारच्या करार शेतीची माहिती देणार्‍या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, मोबाईल स्टार्टर, मिल्किंग मशीन, काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणार्‍या विविध पिकांमधील वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, कमी श्रमात – कमी पाण्यात मात्र शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.
Share post
Tags: #agroworld#exibion#shailandra chauhan#sheti vishay#शेतकरी प्रदर्शन
Previous Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १४ निराधार पत्नींना स्वयंमरोजगारासाठी भरारी फाउंडेशनतर्फे मदतीचा हात

Next Post

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या प्रचार रथाला जिल्हाधिकारी यांची हिरवी झंडी

Next Post
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या प्रचार रथाला जिल्हाधिकारी यांची हिरवी झंडी

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या प्रचार रथाला जिल्हाधिकारी यांची हिरवी झंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group