जळगाव – येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे दि. 3 ते 6 नोव्हेंबरला एकलव्य क्रीडा संकुल एम. जे. कॉलेज येथे ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आला असून या प्रदर्शनाच्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार तसेच ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून या प्रचाराचा शुभारंभ केला.
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावातील हे नववे वर्ष असून प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स बुक करण्यात आले. यावर्षी बियाणे पेरणी, कोळपणी व फवारणी करणारा तसेच जीपीएस प्रणालीवर चालणारा इलेक्ट्रीक बैल ठरणार प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार असल्याची माहिती ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी दिली.
आधुनिक तंत्रज्ञान तसेच कृषी यंत्र व अवजारे हा मुख्य गाभा असलेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत असून याचा शेतकऱ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.