Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अटल करंडक एकांकिका स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाची ‘तो पाऊस आणि टाफेटा’ प्रथम

by Divya Jalgaon Team
October 24, 2023
in जळगाव, मनोरंजन
0
अटल करंडक एकांकिका स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाची ‘तो पाऊस आणि टाफेटा’ प्रथम

जळगाव (प्रतिनिधी) – श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगु काना ठाकूर महाविद्यालय ( स्वायत्त) न्यू पनवेल यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रताप महाविद्यालयाची ‘तो पाऊस आणि टाफेटा’ प्रथम, माणुसकी मल्टीपर्पज बुलढाणा यांची अनपेक्षित द्वितीय तर सातपुडा सामाजिक व शैक्षणिक संस्था शहादा यांची  मॅडम एकांकिका तृतीय क्रमांकाने विजेती ठरली आहे.

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून, ही स्पर्धा महाराष्ट्रभर एकूण नऊ केंद्रांवर  प्राथमिक फेरी स्वरूपात घेतली जाते. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील केंद्रांवर प्रथम येणाऱ्या संघास सात हजार रुपये रोख व द्वितीय येणाऱ्या संघास पाच हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.
जळगाव केंद्राची स्पर्धेची जबाबदारी ही समर्थ कला बहुउद्देशीय संस्था जळगाव यांनी गतवर्षाप्रमाणे याही वर्षी समर्थपणे पार पाडली स्पर्धेत एकूण आठ एकांकिकांचे सादरीकरण झाले व समर्थ कला बहुउद्दिशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश जाधव यांनी व ज्येष्ठ रंगकर्मी योगेश शुक्ल यांनीही युवा रंगकर्मींना रोख बक्षीस देऊन प्रोत्साहित केले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी व्यासपीठावर समर्थ कला बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश जाधव, ज्येष्ठ रंगकर्मी योगेश शुक्ल,  मंत्रालयातील माहिती जनसंपर्क अधिकारी विजय कोळी, स्पर्धेचे परीक्षक भरत सावले, दिनेश गायकवाड यांच्यासह अटल करंडक मुख्य आयोजक टीमचे प्रतिनिधी गणेश जगताप, अमोल खैर, अभिषेक पटवर्धन आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- सर्वोत्कृष्ट लेखन – प्रथम-अनपेक्षित -शैलेंद्र टिकारिया, द्वितीय-तो पाऊस आणि टाफेटा- नितीन साळवे, तृतीय-मॅडम-ऋषिकेश तुराई, सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीत – प्रथम-प्रितेश गजरे,तो पाऊस आणि टाफेटा, द्वितीय-लोकेश मोरे,म्हातारा पाऊस, तृतीय-केशव सूर्यवंशी,हर्षदा पाटील,भारतीय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – प्रथम-माधुरी धनगर (तो पाऊस आणि टाफेटा), द्वितीय-विजय सोनवणे (अनपेक्षित), तृतीय-शशिकांत नागरे (भारतीय), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्रथम – कल्याणी काळे (अनपेक्षित), द्वितीय-माधुरी धनगर (तो पाऊस आणि टाफेटा), तृतीय – युगंधरा ओहोळ (मॅडम),  सर्वोत्कृष्ट अभिनेता – प्रथम – अक्षय ठाकरे (तो पाऊस आणि टाफेटा), द्वितीय – पराग काचकुरे (अनपेक्षित), तृतीय – राहुल मंगळे (लॉटरी), सर्वोत्कृष्ट एकांकिका – प्रथम – तो पाऊस आणि टाफेटा (प्रताप महाविद्यालय अमळनेर), द्वितीय – अनपेक्षित (माणुसकी मल्टीपर्पज बुलढाणा), तृतीय – म्याडम (सातपुडा सामाजिक व शैक्षणिक संस्था शहादा).

पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन स्पर्धा समन्वयक विशाल जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश लांबोळे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रवीकुमार परदेशी, भावेश पाटील, सागर सदावर्ते, मयूर भंगाळे ,संकेत राऊत, महेश कोळी, पूर्वा जाधव, समर्थ जाधव, रोहिणी निकुंभ, तृप्ती बाक्रे, शुभांगी वाडीले इत्यादी परिश्रम घेतले.

Share post
Tags: #Akhil bhartiy naty parishad#drama#अटल करंडक एकांकिका
Previous Post

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय मेहरुण शाळांमधील १०० मुलींचे कन्या पूजन

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 50 लाखांपर्यंत विकास निधी

Next Post
चाळीसगाव तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 50 लाखांपर्यंत विकास निधी

चाळीसगाव तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 50 लाखांपर्यंत विकास निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group