जळगाव – नवरात्रोत्सव निमित्त आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय, मेहरुण शाळांमधील १०० मुलींचे कन्या पूजनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेच्या सर्व उपशिक्षिका यांच्या हस्ते या मुलींची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व उपशिक्षिका स्वाती नाईक यांनी सर्वप्रथम मुलींचे पाय धुतले. त्यांनतर हळद कुंकू लावले. गजरा त्यांना लावुन त्यांची धार्मिक व पारंपरिक पद्धतीनं पूजा केली. यांनतर मुलींना शालोपयोगी साहित्य भेट दिली.
आज दुपारी २ वाजता शाळां मधील मुलींनी जय माता दी चा जयघोष केला. त्यापाठोपाठ पैठणीचा घोळ गं, हिरव्या साडीला पिवळी किनार … आज मंगळवार आज देवीचा मंगळवार. आणि चोरी चोरी माखन खा गये, यशोदा के ललनवा ….. हि गीते रूपाली आव्हाड यांनी सादर केली.
शाळेचे मुख्याध्यापक यांनी मुलींनी भरपूर शिकावे. तुम्हाला ज्या गोष्टी शिकताना आनन्द होतो. तीच गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा. भरपूर वाचन करावे असे सांगितले.