जळगाव – आयुष्यमान भारत कार्ड मोहिमेत जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे मोठ्या प्रमाणावर आघाडी असून जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख 93 हजार 928 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले आहे. अलीकडे सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भव या योजनेच्या माध्यमातून आगामी काळात अद्याप पर्यंत आयुष्यमान भारत कार्ड न मिळालेल्या लाभार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार सामाजिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात विना अडचणीच्या पोहोचण्या साठी आयुष्यमान भारत कार्ड ही संकल्पना अंमलात आणण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब दुर्बल वंचित घटकांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात येते.या माध्यमातून गरीब दुर्बल वंचित घटकांवर उपचार करणे सोपे जाते त्यासोबतच विविध दुर्धर आजारांवर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून उपचार करण्यात येतात. जळगाव जिल्ह्यात आज पर्यंत 14 लाख 68 हजार 625 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी तीन लाख 95 हजार 928 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत काळचे वाटप करण्यात आले आहे.
काय आहे पात्रता
आयुष्यमान भारत कार्ड साठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्रता ठरवून देण्यात आली आहे या 2011 च्या जनगणनेनुसार सामाजिक आर्थिक परिस्थिती पाहून पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यात घराचे सहज पक्के नसलेले, ज्या कुटुंबात महिला कुटुंब प्रमुख आहेत ते कुटुंब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंब,बीपीएल कार्ड किंवा दारिद्र रेषेखालील कुटुंब, सरकारने राबवलेल्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ न घेतलेले कुटुंब असे निकष यासाठी ठरवून देण्यात आले आहे.
वैशिष्ट्य
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील सर्व गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करणार आहे. या माध्यमातून कोणताही गरीब व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत घेऊ शकतो या योजनेअंतर्गत देशातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या सुमारे 50 कोटी रुपयाला धारक कुटुंबांना पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे या जवळ जवळ सर्व माध्यमिक आणि बरीच तृतीय रुग्णालय समाविष्ट असणार आहेत आरोग्य आणि निरोगी कल्याण केंद्रात गरोदरपणात घ्यावयाची काळजी आणि माता आरोग्य सेवा नवजात आणि मुलांची आरोग्य सेवा शिशु आरोग्य सेवा तीव्र संसर्गजन्य रोग संसर्गजन्य रोग मानसिक आजार व्यवस्थापन दंतचिकित्सा वृद्धांसाठी अतिदक्ष चिकित्सा या सेवांचा देखील समावेश असणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली आहे.