जळगाव – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात आज पासून ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्येया उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी व कचरा मुक्त देशासाठी लोकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत यांनी केले आहे.
यामध्ये दृश्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.अभियानात ग्रामीण भागातील बसस्थानके,पर्यटन स्थळे,वारसा स्थळे, नदी किनारे,घाट,नाले आदी ठिकाणी स्वच्छता केली जाणार असून सिंगल युज प्लास्टिक वापर व त्याचे दुष्परिणाम याबाबत गावांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर चित्रे काढणे व कचरा वर्गीकरण पेट्या ठेवणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहे. दरम्यान आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ होईल.
केंद्रीय मंत्री ऑनलाईन सरपंच ,जिल्हाधिकारी, मुख्य कारकरी अधिकारी,गट विकास अधिकारी तसेच शहरी व ग्रामिन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारी यांच्याशी संवाद साधतील असे श्री अंकीत यांनी सांगितले. ओडीएफ प्लस मॉडेल झालेल्या ग्रामपंचायती मध्ये सर्वेक्षन सुरु करण्यात आले आहे. गावात प्रवेश केल्याबरोबर दिसणारी स्वच्छता कायम टिकण्यासाठी ग्रामीण पुरवठा, स्वच्छता समिती व गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून श्रमदानाने स्वच्छता करावी असे आवाहन प्रकल्प संचालक (पाणी व स्वच्छता) यांनी केले आहे.