Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांचा आदर्श उपक्रम

गिरीश महाजन यांच्याहस्ते १२०० विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे होणार वाटप

by Divya Jalgaon Team
September 11, 2023
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
चाळीसगाव तालुक्यातील अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांचा आदर्श उपक्रम

चाळीसगाव – आपल्या विविध समाजोपयोगी उप्रक्रमांसाठी नेहमी चर्चेत असणारे जिल्हा दुध संघाचे चेअरमन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील १२०० अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण समारंभ चाळीसगाव येथे दि.१२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते या विद्यार्थ्यांना सायकल भेट दिली जाणार असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन असणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जळगाव अंकित जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार असणार आहेत. चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान, (सिग्नल पॉइंट) येथे दि.१२ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप होणार आहे.

विद्यार्थ्यांची अवघड शिक्षणवाट सोपी करण्याचा हा सोहळा – आमदार मंगेश चव्हाण 

३ ते ५ किमी पायी प्रवास करीत शाळा व महाविद्यालये गाठणा-या विद्यार्थ्यांची यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. पक्ष, जात – पात, गट – तट, धर्म – पंथ या सर्वच ‘राजकीय’ अटी – शर्ती पुसून टाकतांना निवड समितीने अत्यंत पारदर्शीपणे विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

इयत्ता ७ वी ते १० पर्यंतच्या अनाथ, दिव्यांग, ऊसतोड मजूर, कष्टकरी, कामगार, शेतमजूर पालकांच्या पाल्यांचा यात समावेश आहे. अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतांना त्यांच्या कुटूंबात परिस्थितीने निर्माण केलेले ताणेबाणे, शिक्षणासाठी त्यांचा असलेला संघर्ष अवस्थ करुन जातो तर त्यांची शिकण्याची अपार जिद्द नव्या उमेदीची वात पेटवून जाते. विद्यार्थ्यांची अवघड शिक्षणवाट सोपी करण्याचा हा सोहळा माझ्यासाठी नामदेवाच्या पायरीवर डोक ठेवून भाळी समाधानाचा बुका लावण्यासारखा प्रासादिक आहे. आपण ही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्यावा अशी विनंती आ. मंगेश रमेश चव्हाण यांनी केली आहे.

Share post
Tags: #Distribution of bicycles#MANGESH CHAWHAN#social newsGirish Mahajanचाळीसगाव
Previous Post

दूध भेसळीविरोधात जिल्ह्यात धडक मोहीम

Next Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले गुलाबराव पाटील यांचे सांत्वन भेट

Next Post
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले गुलाबराव पाटील यांचे सांत्वन भेट

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले गुलाबराव पाटील यांचे सांत्वन भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group