जळगाव – आडगाव तालुका एरंडोल येथे अपंग व्यक्ती पंडित मांगो पाटील यांना अपंग सायकल भेट देण्यात आली ही सायकल धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र स्मुर्तीस समर्पण करत तसेच शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने(पाटील) यांच्या संकल्पनेतून व पुणे येथून लक्ष्य फाउंडेशन चे संस्थापक रोशन मराठे यांच्या सौजन्याने भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी गावातील सर्व प्रमुख मान्यवर तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ महाजन, पारोळा आडगाव ग्रामपंचायत सदस्त रवी पवार पारोळा उपतालुका प्रमुख बाळासाहेब पाटील, जळू येथील बाळा राजपूत, भिका चौधरी आडगाव सरपंच सुनील भिल, प्रल्हाद पाटील,युवराज साबळे, उत्तमरावं पाटील, प्रकाश पाटील, श्याम कानडे, संजय पाटील, रावसाहेब पाटील, डी.एन अहिरे, जितेंद्र तागड, संतोष पाटील आदी शिवसैनिक व तथा ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.