जळगाव – जळगाव जिल्हा (ग्रामीण) युवक राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक आज पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते संजयदादा गरुड, युवकचे प्रदेशसरचिटणीस रमेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीत येत्या ५ सप्टेंबररोजी होणाऱ्या खा. शरद पवार साहेबांच्या सभेच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. जास्तीत जास्त संख्येने जाहिर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुबभाई शेख यांचे सूचनेनुसार नवीन जिल्हा कार्यकारीणी निवडण्यासाठी चर्चा करण्यात आली. याशिवाय जिल्ह्यात नवीन तालुकाध्यक्ष, शहराध्यकक्षांचीदेखील निवड करण्यात येणार आहे. त्यावरही चर्चा संपन्न झाली. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांशी संवाद करण्यात आला तसेच कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. प्रदेशाध्यक्षांच्या मान्यतेने नवीन कार्यकारीणीची लवकरच घोषणा केली जाणार असल्याचे युवकचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगीतले.