जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांचा आलेख खाली उतरत आहे. मागील दोन महिन्यापासून ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
आजही मंगळवारी (ता.१०) प्राप्त झालेल्या अहवालात अवघे ४० रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात ७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दिलासादायक बाब अशी की आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
जळगाव शहर –०२, जळगाव ग्रामीण- ००, भुसावळ- ०५, अमळनेर- ००, चोपडा-०२, पाचोरा-०८, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-१६, रावेर-०२, पारोळा-०१, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ४० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ६२९ पर्यंत पोहचली असून, बरे झालेल्यांचा आकडा ५१ हजार ८३० वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा एक हजार २७२ वर कायम आहे. तर ५२७ रुग्ण सध्या उपचार घेताय.


