Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ग.स. सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

माहिती सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली

by Divya Jalgaon Team
November 10, 2020
in जळगाव
0
ग.स. सोसायटीचे नेरकर व ठाकरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

जळगाव प्रतिनिधी। ग. स. सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून हा लाभांश संबधित शाखेत उद्या बुधवार ११ नोव्हेंबरपासून चेकद्वारे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी लोकसहकार गटाचे गटनेते विलास नेरकर, उपाध्यक्ष सुनील पाटील, कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष विश्वास सूर्यवंशी, कर्ज समिती अध्यक्ष अनिल गायकवाड पाटील, संचालक तुकाराम बोरोले, दिलीप चांगरे, सुनील पाटील, यशवंत सपकाळे आदी उपस्थित होते. दिवाळीपूर्वी बोनस मिळावा अशी मागणी सहकार गटातर्फे अध्यक्षांना करण्यात आली होती. कोरोनामुळे लाभ दिला जात नव्हता.

राज्यपालांनी नुकताच आदेश देऊन त्यात सहकारी संस्था लाभांश जाहीर होऊ शकतात असे सांगितल्याने १० % लाभांश देण्यात ठरविण्यात आले आहे. ग. स. सोसायटीचे जिल्ह्यात सुमारे ४० हजार सभासद आहेत. त्या प्रमाणात ९ कोटी ८८ लाख ८८३ रुपयांचे वाटप होणार आहे. उद्या सकाळ दहापासून संबंधित शाखेत सभासदांना लाभाच्या चेकचे वाटप होईल. दरम्यान, सोसायटीचे जे सभासद दिव्यांग आहेत त्यांना एक लाख जादा कर्ज मंजूर करण्यात आले आहे. विशेष कर्ज मर्यादा ४ लाखावरून ६ लाख ५० हजारापर्यंत करण्यात आले आहे.

महापालिकेकडे साडे पाच कोटीची थकबाकी होती ती पाच कोटी परत वसूल करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे तीन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. जनता अपघात विमा १ लाखावरून ३ लाखापर्यंत करण्यात आला आहे.

कर्ज बुडव्यांवर वसुली द्यावे १०१चे व ९ प्रमाणे दावे दाखल करण्यात आले आहे. संस्थेचे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. लोकसहकार गटाची मदत संपली असली तरी शासनाने संचालक मंडळाला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यानंतर शासन जो आदेश देईल त्याचे पालन करण्यात येणार आहे.

अजून वाचा 

जिल्ह्यात आज ७० रुग्ण कोरोनामुक्त तर ४० नवीन आढळले

Share post
Tags: ग.स. सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
Previous Post

जिल्ह्यात आज ७० रुग्ण कोरोनामुक्त तर ४० नवीन आढळले

Next Post

राकेश सपकाळे खून प्रकरणातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

Next Post
राकेश सपकाळे खून प्रकरणातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

राकेश सपकाळे खून प्रकरणातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group