अमळनेर – तालुक्यातील डांगर येथे अमृत महोत्सवी समारोप अंतर्गत मेरी मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमा प्रसंगी जि. प. शाळा डांगर बुद्रुक येथे लोकनियुक्त सरपंच प्रकाश रंगराव वाघ यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या हस्ते मायभूमीच्या मातीने भरलेल्या कलशाचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात नंतर शिलाफलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.त्यानंतर सन्मान सैनिक बांधवांचा हा उपक्रम घेण्यात आला.या प्रसंगी आजी-माजी सैनिक व पोलीस कर्मचारी, त्यांच्या परिवारातील सदस्य यांचा शाल,श्रीफळ, पुष्गुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात निलेश कापडणे, किरण वाघ, योगेश कापडणे, भूषण कापडणे, निलेश कापडणे, दीपक पाटील, प्रमोद पाटील, चंद्रकांत खैरनार, गणेश खैरनार, निरज पाटील, संतोष सोनवणे, अनिल पाटील, सुरेश वाघ, आनंदा वाघ, स्व. कन पाटील यांचे प्रतिनिधी प्रशांत पाटील, स्व. धोंडू बोरसे यांचे प्रतिनिधी संपत बोरसे, स्व. सुभाष सोनवणे यांचे प्रतिनिधी जितेंद्र सोनवणे या बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
त्यानंतर ७५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक धुडकू पाटील, वि.का. सो.चे. शांताराम पाटील, शा.व्य. स. अध्यक्ष महेश पाटील, उपसरपंच राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, राजेंद्र कापडणे, सुदाम सोनवणे, संगीता सोनवणे, सौ.चिंधाबाई सोनवणे, सौ.संगीताबाई बैसाणे, सौ.मिराबाई पाटील, सौ.सीमा पाटील, राजेंद्र कापडणे, विश्वास पाटील व ग्रा.पं. सचिव सोनीबाई पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील, उपशिक्षक संजय पाटील, श्रीमती.सुरेखा पाटील, रविंद्र मासुळे, ग्रामपंचायत कर्मचारी राकेश कापडणे, सुभाष पाटील, जितेंद्र पाटील, प्रवीण पाटील गावातील पोलीस पाटील सौ.सुनंदाबाई खैरनार तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र मासुळे यांनी केले शेवटी ग्रा.प.सचिव सोनीबाई पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.