Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अतिक्रमित घरे शासकीय नियमानुसार नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

by Divya Jalgaon Team
August 14, 2023
in कृषी विषयी, जळगाव, प्रशासन
0
अतिक्रमित घरे शासकीय नियमानुसार नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

जळगाव – धरणगाव नगरपालिका क्षेत्र, मौजे कुसुंबे व मौजे नशिराबाद येथील अतिक्रमित घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तात्काळ कार्यवाही १५ दिवसांच्या आत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात केळीचा पीक विमा काढलेल्या उर्वरीत ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्राची पडताळणी ऑगस्ट महिन्याच्या आत करण्यात यावी. असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिले.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या विविध विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील या प्रकल्पांच्या प्रस्तावांची सद्यपरिस्थिती, प्रलंबित घरकुलांचा समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर सदरचा प्रश्न मार्गी लावण्याच्या संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगाव नगरपालिका हद्दीतील संजय नगर, नेहरूनगर व गौतम नगर येथील १७५४ अतिक्रमण घरांचा प्रश्न शासन निर्णयानुसार लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा. नशिराबाद येथील गट नंबर २३२० मधील अपूर्ण बांधकाम असलेल्या घरकुले व अतिक्रमित घरकुले नियमित करण्याचा प्रश्न तसेच कुसुंबा येथील गट नंबर २३०/२ व ३१५ मधील अतिक्रमण नियमित करण्यासाठी शक्ती प्रदत्त समितीने तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.‌असे निर्देश ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.ठाकूर यांनी जिल्ह्यातील केळी पीक विम्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यापैकी ४४ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राची शेतकऱ्यांनी पडताळणी केली आहे. अद्याप ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्राची पडताळणी बाकी आहे. यावर पालकमंत्री यांनी सूचना दिल्या की, उर्वरित ३७ हजार हेक्टर क्षेत्राची तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या मदतीने पीक विमा कंपनीने तात्काळ पडताळणी करावी.

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे नियमानुकुल करतांना ग्राम विकास विभागाचा २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करावी. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून या जागेची मोजणी फी भरण्याची कार्यवाही करावी. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी एम.पी.मगर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर, जळगाव गटविकास अधिकारी कसोदे, जळगाव प्रांताधिकारी महेश सुधळकर, एरंडोल प्रांताधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार नामदेव पाटील, धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, धरणगाव मुख्याधिकारी विकास नवाडे, नशिराबाद मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी पदाधिकारी निलेश पाटील, जि.प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, पी. एम. पाटील , नाशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील, विकास धनगर, चेतन बरहाटे, रवी कंखरे, ऍड भोलाणे, नरेंद्र सोनवणे, निलेश राजपूत, पंकज पाटील, सी. ए. हरिष आगीवाल, धनंजय सोनवणे यांच्यासह सरपंच, ग्रामविकास अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share post
Tags: #Dharangaon Municipality#NasirabadCollector OfficeGulabrao Patil
Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहण सोहळा

Next Post

डांगर बुद्रुक येथे सत्कार सैनिकांचा यात १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव

Next Post
डांगर बुद्रुक येथे सत्कार सैनिकांचा यात १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव

डांगर बुद्रुक येथे सत्कार सैनिकांचा यात १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group