जळगाव – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम मंगळवार , दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.
या सोहळ्याला जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील, स्थानिक शासकीय / निमशासकीय अधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे.
दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजता या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजेच्या पूर्वी किंवा ९.३५ वाजेनंतर आयोजित करावा. असे आवाहन श्री.गायकवाड यांनी केले आहे.