पाळधी – सूर्या फाउंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे ग्रीन डे उत्साहात साजरा करण्यात आला. आयुक्त डॉ विद्या गायकवाड व मनपा वृक्षारोपण ब्रँड ॲम्बेसेडर वसंत पाटील, मनपा नगररचना विभागाचे श्री.सोनगिरे इ.मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ग्रीन डे साजरा करण्यासाठी शालेय शिक्षकवृंद या सर्वांनी विद्यार्थ्यांसोबत शालेय परिसरात वृक्षारोपण केले. ग्रीन डे साठी विद्यार्थ्यांनी विविध अन्नपदार्थ तयार करून आणले होते व जेवणाचे डबे सुंदर पद्धतीने सजावट करून सादर केले. यावेळी मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड व वसंत पाटील , शालेय संचालक प्रशांत सूर्यवशी , मुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी, पालक प्रतिनिधी किशोर रघुवंशी यांची उपस्थिती होती.