जळगांव – जळगांव जिल्हा स्पोर्टस् असोसिएशन योगासन स्पर्धेमध्ये घेण्यात आलेल्या विविध योगासन प्रकार स्पर्धामध्ये शिवम योगा सेंटर (अयोध्यानगर) मधील विद्यार्थ्यांनी ८- गोल्ड मेडल, ४ सिलव्हर मेडल व ३- ब्राँझ मेडल मिळवून यश संपादन केले असून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी या विद्याथ्र्यांची निवड करण्यात आलेली आहे.
आर्टीस्टीक योगासन सब ज्युनिअर बॉईज पेअर- मोहीत बिऱ्हाडे – गोल्ड मेडल, ओजस मराठे गोल्ड मेडल, आर्टिस्टिक योगासन सब ज्युनिअर बॉईज सिंगल – अरव झवर गोल्ड मेडल, आर्टिस्टिक योगासन सब ज्युनिअर गर्ल्स व सिनिअर गर्ल्स – फाल्गुनी चौधरी गोल्ड मेडल, नम्रता खडके गोल्ड मेडल, सुरभि चौधरी व मुनमुन शर्मा सिलव्हर मेडल यामिनी बोंडे व राधिका असोदेकर गोल्ड मेडल आर्टिस्टीक योगासन सिंगल गर्ल्स – ट्रेडिशनल योगासन सिनिअर मुली – हर्षाली बिन्हाडे सिलव्हर मेडल, – तनिष्का खडके ब्राँझ मेडल ,ट्रेडिशनल योगासन सब ज्युनिअर मुले व मुली – मोहीत बिन्हाडे गोल्ड मेडल, फाल्गुनी चौधरी ब्राँझ मेडलयामीनी बोंडे सिलव्हर मेडल, व राधिका असोदेकर ब्राँझ मेडल या सर्व विद्यार्थ्यांनी विविध योगासन प्रकारामध्ये भरघोस यश मिळविले असुन या सर्व विद्यार्थ्यांना शिवम योग ॲन्ड फिटनेसच्या संचालिका योगशिक्षिका दिपा विशाल कोल्हे व जागृती मिलिंद कोल्हे यांचे मार्गदर्शन मिळालेले आहे.