Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आदिवासी कोळी जात प्रमाणपत्र मुद्द्यावर राजभवनात मंथन

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करणार- राज्यपाल बैस

by Divya Jalgaon Team
July 10, 2023
in जळगाव, सामाजिक
0
आदिवासी कोळी जात प्रमाणपत्र मुद्द्यावर राजभवनात मंथन

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आदिवासी मंत्री व आदिवासी विकास विभागास निर्देशित करण्यात येईल तसेच याबाबत विस्तृत बैठक घेऊन महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी इ. जमातीच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.

जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याच्या अनुषंगाने राजभवन, मुंबई येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली त्यावेळी बैस बोलत होते.

या बैठकीमध्ये आमदार रमेशदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील आदिवासी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी इ. जमातींना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देताना जात पडताळणी समितीकडून कशाप्रकारे जाणीवपूर्वक भेदभाव केला जातो आणि सामाजिक आरक्षणापासून व इतर शासकीय लाभापासून आदिवासी कोळी जमातीला कसे वंचित ठेवले जाते हे राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.

कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांनी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागातील अनुसूचित जमातीतील बांधवांची जात वैधता प्रमाणपत्राची प्रकरणे जात पडताळणी समितीमार्फत जाणीवपूर्वक अवैध ठरवण्यात येतात परंतु त्यानंतर न्यायालयात अपील केल्यानंतर या अनुसूचित जमातीतील बांधवांची जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरल्याची अनेक उदाहरणे दाखवून दिली.

दरम्यान प्राध्यापक शरण खानापुरे यांनी टीएसपी आणि ओटीएसपी मध्ये भेदभाव करून ओटीएसपी क्षेत्रातील साडेपाच टक्के आदिवासी जमातींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याने त्यावर आपल्या मार्फत निर्देश द्यावेत अशी विनंती राज्यपाल महोदयांना केली. यावेळी प्रकाश बोबडी, राजहंस टपके, देवानंद भोईर, शिवशंकर फुले, सतीश धडे, अविनाश कोळी, मुकेश सोनवणे, गीतांजली कोळी, बाळासाहेब सैंदाणे, शंकर मनाळकर, राम सुरडकर, धीरज सनगाळे, दत्तात्रय सुरवसे इत्यादी जळगाव सह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share post
Tags: # Governor Ramesh BaisMLA Rameshdada Patilआदिवासी कोळी
Previous Post

अनुभूती निवासी स्कूलमध्ये इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थी अभ्यासताय आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

Next Post

धुळे ट्रक अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मोरारी बापूंची श्रद्धांजली आणि मदत

Next Post
धुळे ट्रक अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मोरारी बापूंची श्रद्धांजली आणि मदत

धुळे ट्रक अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मोरारी बापूंची श्रद्धांजली आणि मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group