Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमध्ये इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थी अभ्यासताय आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

by Divya Jalgaon Team
July 2, 2023
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
अनुभूती निवासी स्कूलमध्ये इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थी अभ्यासताय आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

जळगाव  – अनुभूती निवासी स्कूल मध्ये नेहमीच आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास यांची सांगड घातली जाते. जेणे करून विद्यार्थ्यांना योग्य वयात योग्य ते शिक्षण घेता यावे. काळाच्या पुढे जाऊन अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरवातीपासूनच विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, गणित या विषयाला धरून (STEM Lab) कार्यान्वित आहे.

अनुभूती इनोव्हेशन सेंटर मध्ये आता आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आणि रोबोटिक लॅबची भर पडली आहे. इयत्ता ५ वी पासून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण मिळत आहे. पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक सांकेतिक दुनियेत विद्यार्थी सक्षम होऊ पाहत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व औद्योगिक कौशल्ये विकसीत केली जावीत म्हणुन सीआयएससीई, दिल्ली बोर्डाने या वर्षापासून अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) विषयाचा समावेश केला आहे.

अनुभूती स्कूलमध्ये विद्यार्थी इयत्ता ९ वी पासून हा विषय अभ्यासत आहेत. तसेच इयत्ता ५ वी ते ८ वी चे विद्यार्थीसुद्धा आर्टिफ़िशियल इन्टेलिजन्स क्लब मध्ये प्रात्याक्षिकासह अनुभव घेत आहेत. जेणे करून याविषयाचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल. त्याकरिता अनुभूती निवासी स्कूल व्यवस्थापनाने स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून अत्यंत अनुभवी शिक्षकांची नेमणूकसुद्धा केली आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थी रोबोटिक्स, कोडिंग, थ्री डी प्रिंटींग, ड्रोन्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी अशा विषयांचा सखोल अभ्यास करू शकतील. त्यासाठी लागणाऱ्या अद्ययावत संसाधनांची पुर्ततासुद्धा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी, अनुभवाधारित शिक्षणासाठी अनुभूती निवासी स्कूल कायम कटिबद्ध आहे. एवढ्या विस्तृत श्रृखंलेत विविध विषयांचे ज्ञान देणारी अनुभूती स्कूल अजून तरी अशा प्रकारची एकमेव स्कूल असल्याचे प्रतिपादन संचालिका सौ. निशा जैन यांनी केले.

Share post
Tags: # Ashadhi Ekadashi#अनुभूती निवासी स्कूल
Previous Post

‘बोलवा विठ्ठल’ मध्ये पांडुरंगाची प्रचिती

Next Post

आदिवासी कोळी जात प्रमाणपत्र मुद्द्यावर राजभवनात मंथन

Next Post
आदिवासी कोळी जात प्रमाणपत्र मुद्द्यावर राजभवनात मंथन

आदिवासी कोळी जात प्रमाणपत्र मुद्द्यावर राजभवनात मंथन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group