जळगाव – देशात लहान मुलांपासुन तर वयोवृद्ध लोकांपर्यंत व्यसनाधीनता लागलेली आहे आज भारतात सुमारे २कोटी लहानमूलं , १६ कोटी तरुण तर ३६ कोटी इतर वयोगटातील लोक वेगवेगळ्या व्यसनांनी ग्रस्त आहेत. या करीता जनप्रबोधन करुन व्यसनमुक्त समाज घडवावा व या करीता केवळ पंधारवाडा न पाळता वर्षभर व्यसनमुक्त विविध उपक्रम राबवावे असे आवाहन प्रसिद्ध साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.
सामाजिक न्याय विभागातर्फे नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृति पंधारवाडा समाप्ति, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस व सामाजिक न्याय दिवस निमित्त आय टी आय, जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.
सामाजिक न्याय दिवस अर्थात राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमात जयसिंग वाघ यांनी शाहू महाराज यांच्या सामाजिक , शैक्षणिक कार्याचा आढावा घेवून ते या देशातील सामाजिक व शैक्षणिक जाण असलेले सम्राट अशोका नंतरचे पहिले राजे होते हे स्पष्ट केले. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले जे पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवीणार नाही त्यांना दंड ढोढाविला , फार मोठ्या प्रमाणात वस्तीगृह बांधले , मागास समाजास ५० % आरक्षण लागू केले .शाहू महाराज म्हणजे माणसा मधला राजा व राजां मधला माणूस होय असेही वाघ यांनी स्पष्ट केले.
समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी भारत नशा मुक्त करण्या करीता केंद्र सरकार , राज्य सरकार करीत असलेल्या विविध उपाय योजना तसेच आपली काय कर्तव्ये आहेत याची माहिती देवून विद्यार्थ्यांनी मोठ्यप्रमानात अभ्यास करुन यश संपादन करावे असे आवाहन केले. प्राचार्य संजय पाटील यांनी अध्यक्ष स्थानावरुन भाषण करतांना व्यसन मुक्त भारत करणे कामी आपण वचनबद्ध होवू या असे आवाहन केले.
विनोद ढगे यांनी ‘नशा करी दुर्दशा’ हे पथनाट्य सादर करुन नशेचे दुष्परिणाम काय काय होतात हे पटवून दिले त्या नंतर सर्व उपस्थित विद्यार्थी, कर्मचारी, मान्यवर यांना व्यसनमुक्ति ची शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप उगले यांनी केले . कार्यक्रमास रविंद्र बारी , राजेंद्र पाटील , प्रमोद मोरे , लोकेश धांडे , नितिन चौधरी , विनायक बाविस्कर , दीपक महाजन तसेच इतर अधिकारी व कर्मचारी तसेच ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी हजर होते .
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सचिन महाजन , दुर्गेश अंबेकर , संतोष चौधरी , अरविंद पाटील , अवधूत दलाल यांनी परिश्रम घेतले , कार्यक्रमाच्या अखेरिस जनजागृती यात्रा काढण्यात आली . या यात्रेस सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली .