पाळधी – सूर्या फाउंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिंडी सोहळ्याची सुरुवातीला प्रशांत सूर्यवंशी व अर्चना सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती पूजनाने झाली.
टाळ मृदंगाच्या गजरात आणि विविध समाज घोषणा देत मिरवणूक नोबल इंटरनॅशनल स्कूल ते साई कॉलनी पर्यंत काढण्यात आली. साई बाबा मंदिरात पालखी ची पूजा मंदिरातील पुजरींच्या हस्ते करण्यात आली होती त्या नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नोबल इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर शिक्षक व शिक्षकेतर विद्यार्थी या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.