जळगाव – शहराचे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे सुनील वामनराव खडके यांनी नामनिर्देशन पत्र भरले आहे.
भारतीय जनता पार्टीतर्फे उपमहापौर पदाच्या निवडीसाठी चार नामनिर्देशन पत्र घेण्यात आली होती. यापैकी दोन नामनिर्देशनपत्रे ही सुनील वामनराव खडके यांची आज अर्ज भरून नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे सुपूर्द केली.
नामनिर्देशन पत्र भरतांना महापौर भारती सोनवणे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक जितेंद्र मराठे, पार्वताबाई भिल, रेश्मा काळे, कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, एडवोकेट पोकळे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, डॉ. राधेश्याम चौधरी, मनोज अहुजा, महेश जोशी, नितीन इंगळे, भरत सपकाळे, पिंटू काळे, अतुल हाडा, गोकुळ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.