पारोळा- दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पारोळा येथील एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर विष पाजून खून केल्याचा खळबळजनक आरोप मयत मुलीच्या नातेवाईकांनी लावला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. धक्कादायक : दलित मुलीवर सामूहिक अत्याचार करून विष पाजून खून.
दोन-तीन दिवसांपूर्वी एका 20 वर्षीय दलित तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. या संदर्भात नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती. त्यानंतर दुसर्या दिवशी पारोळा बस स्थानकाचे मागे पीडित तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला धुळे येथील रुग्णालयात दाखल केले असता तिला काहीतरी विषारी पदार्थ पाण्यात दिलाचा आरोप नातेवाईकांनी केला. धक्कादायक : दलित मुलीवर सामूहिक अत्याचार करून विष पाजून खून.
आज पहाटे उपचारादरम्यान पीडित तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर पीडित तरुणीचे मामा नुकतेच पारोळा पोलीस स्थानकात फिर्याद देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, पीडित मुलीवर तीन ते चार जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि तिला काहीतरी विषारी पदार्थ देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच डॉक्टरांनी देखील आम्हाला तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना केली आहेत.
या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यावेळी चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे नगरसेवक पिरण अनुष्ठान यांच्यासह चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिस स्थानकात थांबून आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अजून वाचा
दमानिया यांच्या व्हिडीओवर अश्लील कॉमेंट करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा