जळगाव प्रतिनिधी । २२ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेचा व्हिडीओ व्हायरल केले होता. अंजली दमानिया यांनी सोशल मीडियात शेअर केलेल्या व्हिडीओवर अश्लील कॉमेंट करणार्या बोडवडातील दोघांविरूध्द सायबर शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजली दमानिया यांनी २२ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेचा त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित केला होता. त्यावर काही जणांंनी अश्लील व आक्षेपार्ह कॉमेंटस केल्या होत्या. त्याविरुद्ध युवासेनेचे बोदवड तालुका समन्वयक अमोल व्यवहारे (रा.नाडगाव, ता.बोदवड) यांनी आपले सरकार पोर्टलवर २३ ऑक्टोबरला पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आयटी अॅक्ट कलम ६७ नुसार गुन्हा दाखल झाला.
अजली दमानिया यांच्या व्हीडीओवर अहमद खान आणि दीपक एस.एस. या नावाच्या अकाऊंटवरून अश्लील कॉमेंट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.