जळगाव । तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील घरकूल घोटाळ्यात माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्यासह यांच्यासह ४३ जणांना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींमध्ये महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पाच नगरसेवकांचा समावेश आहे. या पाच नगरसेवकांना अपात्र करावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. घरकुल घोटाळ्यात दोषी ठरलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दाखल केलेल्या दाव्यात जिल्हा न्यायालयाने महापालिका आयुक्तांसह नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत.घरकुल घोटाळा: पाच दोषी नगरसेवकांना बजावल्या नोटिसा.
घरकुल घोटाळा: पाच दोषी नगरसेवकांना बजावल्या नोटिसा. महापालिकेत सत्तेत व राज्यात विरोधात असलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. या खटल्याची ७ नोव्हेंबर रोजी १००/२०२० या क्रमांकाने नोंद झाली आहे. यात न्यायालयाचे सहा अधिक्षकांनी ९ नोव्हेंबर रोजी आयुक्तांसह पाचही नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.
यात आयुक्त सतीश कुलकर्णी, भाजपचे गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे यांना नोटीस बजावली. या सर्व सहा जणांना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा गैरहजेरीत सुनावणी होवून निर्णय देण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता या सुनावणीमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अजून वाचा
त्या.. ५ नगरसेवकांचे भवितव्य आता कोर्टात