जळगाव – जळगाव शहरातील भारत नगर येथे वेळेत पाणी सोडण्यात यावा या समस्याबाबत अनेक वेळा उपमहापौर कुलभूषण पाटील यांना सांगून ही त्यांनी खोटे आश्वासन देऊन दोन ते तीन महिने उलटले तरी ही पाणी एकाच वेळेत यावा ही समस्या अद्याप ही काही सुटलेली नाही त्यामुळे उपमहापौर यांचे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी ऐकत नाही किंवा कुलभूषण हेच नागरिकांचा समस्येकडे लक्ष देत नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.
भारत नगर येथे 15 वर्षांपासून पिण्याचे पाणी हे सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान सोडले जात होते. मात्र 3 महिन्यापासून पाण्याची एकवेळ ही राहिली नाही कधी दुपारी 2 वा तर कधी 5 वा तर कधी संध्याकाळी तर कधी रात्री पाणी सोडण्यात येते. त्यामुळे या पाण्याबाबत होणाऱ्या समस्या चे ग्रहाने कुलभूषण पाटील यांच्याकडे अपेक्षेने मांडण्यात आले होते.
कारण या वॉर्डचे नगरसेवकांना वॉर्डात होणाऱ्या समस्यांशी काही घेणं – देणं नाही त्यांनी आधी बेडुकप्रमाणे पक्ष बदलले तर आता नेत्यांची ते चाटूगिरी करण्यात व्यस्त असतात त्यामुळे त्यांना सांगून ही काही उपयोग नाही असा संताप यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांना भेटून पाण्याबाबत होणारी समस्या मांडण्यात आली त्यावेळी त्यांनी 8 दिवसात ही समस्या सोडवली जाईल असे आश्वासन दिले मात्र 3 महिने उलटून ही पाण्याबाबतची समस्या अद्याप ही ‘जेसे थी तशीच आहे’ त्यामुळे पूर्वी प्रमाणे सकाळचा वेळेत पाणी सोडण्यात यावा अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
एकाच वेळी दोन नळातून पाणी
2 महिन्यापासून अमृत योजनांच्या नळातून तसेच आदी असणाऱ्या नळातून एकाच वेळी पाणी सोडले जाते मात्र वेळेत का सोडले जात नाही तसेच 15 वर्षापासून पाण्याची वेळ ही सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान होती तर वेळेत का बदल करण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला जात असून पूर्वी प्रमाणेच पाणी सकाळचा वेळेत सोडण्यात यावा अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.