Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उत्तम आरोग्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून योग साधना

by Divya Jalgaon Team
June 21, 2023
in क्रीडा, जळगाव
0
उत्तम आरोग्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून योग साधना

जळगाव – जैन इरिगेशनच्या जैन अॅग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन हायटेक प्लान्ट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा यासह अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, गांधी रिसर्च फाऊंडेशन यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. आरोग्याविषयी सजग होत प्रशिक्षकांकडून योगाभ्यास समजून घेतला.

स्वस्थ हृदयासाठी योग्य योग आणि आहार या संकल्पनेवर योग दिन साजरा केला. सांस्कृतिक, धार्मिक उत्सवांप्रमाणेच योगउत्सव असून योग, प्राणायाम, ध्यान हे दैनंदिन जीवनात अंगिकार करण्याचा संकल्प जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या सहकाऱ्यांनी केला.सात्विक आहारासह योगाचे महत्त्व जैन फूडपार्क, एनर्जी पार्क व अॅग्री पार्क च्या ९०० च्यावर सहकाऱ्यांनी योग आणि आहारातून आरोग्यमय जगण्याचा मंत्र समजून घेतला. योग प्रशिक्षीका कमलेश शर्मा यांनी स्वात्विक, राजसीक, तामसीक आहाराबाबत सांगितले. सकस आहार असेल तरच मन शांत राहते.

मन शांत ठेऊन शारिरीक व्याधींना दूर ठेवता येते, यासाठी रोज एक तास सूर्यनमस्कार करावे. यामूळे बाह्य शरीर, अवयव आणि मन यावर काम करता येते. चांगली झोप, भोजन, व्यायाम व प्राणायाम यातून उत्तम आरोग्य राखता येते. असे मार्गदर्शन करत सहकाऱ्यांकडून प्रात्यक्षिकांसह योगाची विविध आसने  कमलेश शर्मा यांनी करून घेतले. त्यांचे स्वागत डॉ. जयश्री राणे यांनी केले.

वरिष्ठ सहकारी रोशन शहा यांनी आभार मानले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल ढाके, सुनील गुप्ता, प्रदीप सांखला, व्ही. पी. पाटील, आर. बी. येवले यांच्यासह वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, भिकेश जोशी, आर. डी. पाटील यांच्यासह मानव संसाधन विभागाच्या सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

जैन प्लास्टिक पार्क येथे योगा दिवस साजरा
मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीर, मन आणि बुद्धी यांना संयमित करण्यासाठी योगाभ्यास ही उत्तम साधना आहे. २१ जून जागतिक योग दिनाच्या औचित्याने जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क येथील प्रशासकीय इमारतीसमोरच्या पटांगणावर योगगुरु सुर्यागीरीजी उर्फ सुभाषजी जाखेटे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करून घेतला. यावेळी कंपनीच्या सहकारी सौ. संगीता खंबायत यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

प्लास्टिक पार्क येथील सुमारे हजारहून अधिक स्त्री व पुरुष सहकारी उपस्थित होते. आरंभी कंपनीचे सहकारी किशोर बोरसे यांनी प्रास्ताविक केले. त्यात ते म्हणाले की, ज्या प्रमाणे मोठ्याभाऊंनी कार्याचा वारसा दिला त्याच प्रमाणे उत्तम आरोग्याचा मंत्र ही दिला. सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे या दृष्टीने कंपनीत विविध उपक्रम राबविले जातात याबाबत त्यांनी सांगितले.

Share post
Tags: #yoga day#योग दिनjain irrigation
Previous Post

भारत नगर येथे वेळेत पाणी सोडण्यात यावा नागरिकांची मागणी

Next Post

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता १५ जुलै अर्ज सादर करावेत

Next Post
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता १५ जुलै अर्ज सादर करावेत

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता १५ जुलै अर्ज सादर करावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group