चाळीसगाव – केंद्रातील मोदी सरकारला यशस्वी ९ वर्षेपूर्ती निमित्ताने “मोदी@9” या उपक्रम अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्याचे ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास तीर्थ मोटार सायकल (बाईक) रॅली तसेच भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरियर्स शाखाचे उदघाट्न सोहळा पार पाडण्यात आला.
मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी बाईक रॅली मध्ये सहभागी होऊन स्वतः बाईक चालवत सर्वांचा उत्साह वाढवला. तसेच गिरीश महाजनांनी सर्वांना मार्गदर्शन करत ९ वर्षात मोदी सरकारच्या माध्यमातून देशात झालेले परिवर्तन व विविध लोकोपयोगी योजनांची माहिती दिली.
यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बाईक रॅलीची सुरुवात भाजपा अंत्योदय जनसेवा कार्यालयापासून करण्यात आली तर अंध शाळा – कॅप्टन कॉर्नर कडून – रेल्वे स्टेशन – स्टेशन रोड – पोलीस स्टेशन – बाजार पेठ मार्गे हॉटेल शिवनेरी घाट रोड येथे समारोप करण्यात आला.