पारोळा – पारोळा कृ. बा. समिती येथे आज दि १९ जून रोजी शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख डॅा. हर्षल माने (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला असून यावेळी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले असून जय भवानी जय शिवाजी चा घोषणा देण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवारात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आले. याप्रसंगी पारोळा येथील सर्व शिवसेना ,युवासेना, अल्पसंख्यांक ,वाहतुक सेना पदाधिकारी, शिवसैनिक यांची उपस्थिती होती.