जळगाव – ग्रीन सिटी जळगाव या संस्थेमार्फत आज रामदास कॉलनी परिसरात 100 झाडांच्या लागवडीची सुरुवात करण्यात आली असून यावेळी माजी मंत्री सुरेश दादा जैन, राजू मामा भोळे ,प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, गुलाबराव देवकर, मनीष जैन, महापौर जयश्री महाजन, आयुक्त विद्या गायकवाड, नगरसेवक बंटी जोशी ,नितीन बरडे ,गायत्री राणे ,उज्वला बेंडाळे ,सुचिता हाडा, पीपल बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, नितीन लड्डा, एडवोकेट केतन ढाके आदी मान्यवरांच्या उपस्तीथी होती.
यावेळी सर्वांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून प्रकाश चौबे ,सचिन अग्रवाल, हरगोविंद मणियार, वाणी समाजाचे कार्यकारी सदस्य श्री व सौ बी एल वाणी, विनोद चौधरी, आनंद मराठे, डॉ बेंद्रे , एल के सूद, राकेश पाटील , जाजू बंधू प्रकाश जैन, नंदू अडवाणी स्वरूप लुंकड किशोरतात्या पाटील व ग्रीन जळगाव सिटीचे सर्व सदस्य हजर होते. तर ग्रीन जळगाव सिटी संस्थेचे अध्यक्ष विजय वाणी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.