जळगाव – इकरा युनानी मेडिकल कॉलेजला यावर्षी तीन ग़ोल्ड मेडल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 बी.यु.एम.एस. अभ्यासक्रमाचे लेखी परिक्षा घेण्यात आल्या असून त्या मध्ये इकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकणारी काझी नुर फातेमा अजिमुद्दीन हिला गोल्ड मेडल मिळाले.
तर द्वितिय वर्षात खान सारामोहम्मद कैसर हिला गोल्ड मेडल मिळाले तसेच तृतीय वर्षात दानिया जावेद शेख हिला गोल्ड मेडल मिळाल्याने इकरा युनानी मेडिकल कॉलेजचा बी.यु.एम.एस. अभ्यासक्रमाच्या विषयानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात टॉपर म्हणुन महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असल्याने महाविद्यालयातील गोल्ड मेडललिस्ट विद्यार्थींनीचे डॉ. अ. करीम सालार व सोसायटीचे अब्दुल अजीज सालार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी अमीनुद्दिन बादलीवाला, अ. मजीद जकेरिया, जाबियुल्ला शाह, तारीक अन्वर, प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख यांची उपस्थिती होती.