जळगांव – विद्यार्थ्यांनी स्वतःची निर्णय क्षमता विकसित केल्यास कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्याची संधी उपलब्ध असते असे प्रतिपादन शिक्षण तज्ञ मोहम्मद अमीर अन्सारी (मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
जळगाव येथील ईमदाद फाउंडेशन आयोजित दहावी व बारावी नंतर काय याबाबत अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज दुपारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मो. आमिर अन्सारी यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार व त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात पुढे जाऊ द्यावे त्याकरता पालकांनी कोणताही हस्तक्षेप करू नये असे आव्हान यावेळी त्यांनी केले. जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व पालक यांनी या चर्चासत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
ईमदाद फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ‘एज्युकेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत प्रथमच असे शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात होते आले असुन या प्रकारचे कार्यक्रम नियमित आयोजित केले जातील अशी माहिती ईमदाद फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांनी दिली.
ईमदाद फाउंडेशन चे मार्गदर्शक शकील देशपांडे,असलम पटेल, सचिव मो. आरीफ देशमुख, उपाध्यक्ष मतीन पटेल, आसिफ देशपांडे, मंचावर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलफैज पटेल यांनी केले तर समारोप सद्दाम पटेल यांनी केला.