अमळनेर – अमळनेर शहरात दि. 9 जून रोजी रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली होती.
त्यामुळे शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात दि.10 जून सकाळी 11.00 वाजेपासून ते 12जून सकाळी 11.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे असून आवश्यकता वाटल्यास संचारबंदीमध्ये वाढ करण्यात येईल.
अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे