पारोळा – पारोळा शहर कृषी क्षेत्रातल्या बी बियाणे, रासायनिक खते, औषधी या संदर्भातील खानदेशातील मोठी बाजारपेठ असून याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे परंतु असे न होता येथील कृषी केंद्र संचालक बी बियाणे हे शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विकत असल्याचे शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेला सांगितले.
बिल शासकीय दरानेच दिले जाते परंतु खाजगी दर जास्तीचे राहते तशा बिलाची मागणी केली तर बियाणांची बँग शिल्लक नाही अशी उत्तरे दिली जातात आणि हे दिवस लागवडीचे असल्याने शेतकरी चा नाविलाज होत असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रात सुनील देवरे यांनी दिली.
तक्रार कोणाकडे करावी हे सुद्धा कळत नाही म्हणून आम्ही अचानक शहरातील काही दुकानांना भेट देत चौकशी केली असता असे लक्षात आले की शासन यंत्रणा या सर्व लॉबी च्या दावणीला बांधली आहे. कृषी अधिकारी समोर असतांना देखील स्टॉक लिहिलेले नव्हते विचारले असता न पटणारे उत्तरे दिले जात होते.
जर शासकीय अधिकारी यांनाही ही लॉबी जुमानत नसेल तर सर्व सामान्य शेतकरी चे काय होत असावे, शेतकऱ्यांची सरळ सरळ फसवणूक आणि लूट करताना दिसत आहेत शासनाने कापसाच्या प्रती बँग 853 रुपये हा दर ठरवलेला असून पारोळा तालुक्यातील कृषी केंद्र संचालक हे काही विशिष्ट प्रकारच्या वाणांची बँग बाराशे ते पंधराशे रुपये पर्यंत विक्री करताना दिसत आहेत म्हणून आज महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन भेटी देऊन कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांची ही आर्थिक लूट व न चालणारे नको ते वान देऊन त्याच्या शेतीच्या वार्षिक उत्पन्नामध्ये घट निर्माण करण्याचे कटकारस्थान कृषी संचालक करताना दिसत आहेत म्हणून महाराष्ट्र शेतकरी संघटना शांत बसणार नाही असे मत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी व्यक्त केले