Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन

फालीच्या नवव्या संमेलनाचा समारोप

by Divya Jalgaon Team
June 8, 2023
in कृषी विषयी, जळगाव, शैक्षणिक
0
फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन

जळगाव दि.८ प्रतिनिधी – शेत, शेतकरी यांच्या जीवनात विज्ञानाच्या मदतीने उत्पन्न वाढीच्या दृष्टिने जैन इरिगेशनसह इतर कृषिपुरक कंपन्या प्रयत्न करत आहेत. मात्र सामाजीक, राजकीय, शासकीय सर्वच स्तरावर सामाजिक प्रश्न जो गांभीर्य धरत आहे तो म्हणजे शेत, शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळत नाही. ही प्रतिष्ठा फालीसारख्या उपक्रमातून मिळू पहात आहे. समाजाकडून जे घेतले त्यातून उतराई होण्याचा फाली हा उपक्रम कौतूकास्पद असल्याचे प्रतिपादन जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केले.

जैन हिल्स येथे सुरू असलेल्या फाली च्या नवव्या संमेलनाच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत अतुल जैन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी यांच्यासह ज्यांनी प्रायोजकत्व केले त्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुत्रसंचालन हर्ष नौटियाल, रोहिणी घाडगे यांनी केले. आभार नॅन्सी बॅरी यांनी मानले त्यात त्यांनी फाली ई कोर्सची संकल्पना राजस्थान येथून सुरू करत असल्याचे सांगितले. याची जबाबदारी सौ. अंबिका अथांग जैन यांनी घेतलेली असल्याचे जाहिर केले. रूचिता तोटे, क्षितीजा कुंभार, गुंजन चौधरी, सुप्रिया जिते या फालीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

यासोबतच माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. कंपनी प्रतिनिधींच्या वतीने डॉ. जयंत उमरे, मयूर राजवाडे, सौरभ घोषरॉय, आशिष शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरात संवाद साधला. यात जैन इरिगेशनच्या प्रेरणादायी प्रवासाची गोष्टी स्वरूपात माहिती दिली. शेती समोर असलेली आव्हाने दूर करत असताना सामाजिक दृष्टीने संवेदनशील पणे बघणे गरजेचे आहे. शेती समाजात पत, प्रतिष्ठा मिळावी.

फाली हा विद्यार्थ्यांसह शेतीमधील भविष्यदर्शी नेतृत्व निर्माण करण्याचा यज्ञ आहे. आम्ही भारतीय म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा यज्ञ अव्याहतपणे सुरू ठेवावा. कारण शेती हाच जगातील कुठल्याही देशाचा प्रगतीचा मार्ग आहे. शेती हिच संस्कृती असून तेच जीवन आहे. भविष्यात शेत, शेतकरी यांची कास सोडू नका अशी साद अतुल जैन यांनी उपस्थितांना घातली.

जैन हिल्सच्या आकाश मैदानावर विद्यार्थ्यांनी ३१ इन्होव्हेशन व बिझनेस प्लॅन सादर केले. यात बायोडिझेल फॉर्म, स्पिरुलिना शेती, बांबु शेती व त्याची उत्पादने, मल्टी व्हिटामिन पावडर, मल्टि पर्पज फ्रूट एन्झाईम, आवळा शेती आणि त्याची अन्य उत्पादने, आयुर्वेदीय शेती, केळीचा खजिना, मधमाशी पालनातून मधाचे संकलन’ कापड निर्मिती, एकात्मिक शेती, चिया सिड फार्मिंग, नारळाच्या करवंटीपासून शोभेच्या वस्तू, मिरची पावडर व लोणचे, भरघोस वाढीसाठी ॲमिनो ॲसिड, काॕकनट फॕक्टरी, शेवगाची पानं, सेंद्रिय गुळ पेढा, धुप अगरबत्ती उत्पादन, मनुका तयार करणे, कढिपत्याची चटणी व अन्य उत्पादने, बिट उत्पादन व अन्य उत्पादने, तृणधान्यापासून कुरकुरे, भाजी व फळं निर्जिलीकरण, गोसबेरी प्रोडक्टर अशी भन्नाट कल्पना असलेले मॉडेल प्रभावीपणे सादर केले.

Share post
Tags: #FaliJain Hillsjain irrigationजैन इरिगेशन
Previous Post

गैबनशहा बाबा दर्गावर फातिया वाचत असतांना पाठीमागून तिक्ष्ण हत्याराने केला तरुणाचा खून

Next Post

अमळनेर शहरात आजपासून कर्फ्यू लागू

Next Post
अमळनेर शहरात आजपासून कर्फ्यू लागू

अमळनेर शहरात आजपासून कर्फ्यू लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group