जळगांव – शहरातील कालिका माता मंदिर परिसरात ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त सकाळी दहा वाजता वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुबोनियो केमिकल्स व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातुन कालिका माता मंदिर परिसरात विविध वृक्षांची लागवड करून परिसर हिरवेगार करण्यात येणार आहे.
मराठी प्रतिष्ठान मार्फत या वर्षी शहरातील विविध भागात पाच हजार झाडं लावण्यात येणार आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात निसर्गप्रेमी,पर्यावरण प्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती सुबोनियो केमिकल्स चे संचालक सुबोध चौधरी ,मराठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांनी दिली आहे.